Qualified SET | महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स | USIC | | | | |
  • header-about3
  • header-about2
  • header-about4
  • header-about
  • header-about5
  • header-about5
  • header-about5
  • header-about5
header-about31 header-about22 header-about43 header-about4 header-about55 header-about56 header-about57 header-about58
About Us Academic-Details एक जिद्दी व्यक्तीमत्व अल्प परिचय Academic Responsibilities Research-Project
केशव यशवंत राजपुरे : एक जिद्दी व्यक्तीमत्व

*प्रा. (डॉ) केशव राजपुरे* : एक जिद्दी व्यक्तीमत्व (युवकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही यशोगाथा पाठवित आहे. ज्यांना गरज आहे त्यांना जरूर पाठवा.)

श्रीयुत केशव यशवंत राजपुरे यांचा जन्म वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका छोट्याश्या वाडीत; अनपटवाडी येथे २४ जुलै १९७१ रोजी झाला. वस्तुत: त्यांच्या वडिलांचे मुळ गाव बावधनचीच दुसरी एक वाडी; दरेवाडी. एका गरीब, शेतकरी कुटुंबात जन्मलेला केशव पुढे एम.एस्सी. पी.एच.डी. एवढी झेप घेईल असे त्यांच्या आई-वडिलांनी तेव्हा कुणाला सांगितलं असतं तर विश्वासच बसला नसता. अशिक्षित आई-वडिल, घरात इतर भावंडं ( पाच बहिणी व एक भाऊ ) व बाहेरची दमडीचीही मिळकत नाही अशा परिस्थितीत आपल्या मुलाबद्दल असा पालकांनी हट्ट धरला तर इतर अजूनही हसतातच की ! अशा वेळी जर एकाद्याचे नशीब तसेच शैक्षणिक गुणवत्ता बलवत्तर असेल तर तो कुठपर्यंत झेपावेल हे सांगणं कठीणच !

प्राथमिक शिक्षणादरम्यान ते एवढे केंद्रस्थानी आले नाहीत पण एस.एस.सी. च्या परिक्षेपर्यंत त्यांना त्यांचा वर्गात दुसरा क्रमांक आलेला आठवत नाही; ते नेहमी प्रथमवर्ग प्रथमांकच येत!! चौथीच्या केंद्रपरिक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण (७४.२५ टक्के) मिळाल्याने ते निराश झाले नाहीत तर त्याहीपेक्षा अधीकाधीक गुण कसे मिळतील, त्यासाठी काय करावं ? याचा शोध घेऊ लागले. शेवटी त्याला उत्तर सापडलं - यशाचं गमकं - योग्य, नियमीत अभ्यास व पाठांतर !!! हो पाठांतरच ! तदनंतर त्यांनी पाठीमागं पाहीलं नाही. आर्थिक चणचण असूनही केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर, येण-केण प्रकारे शिक्षण प्रवास सुरु ठेवला. माध्यमिक शिक्षणादरम्यान भरपूर बक्षिसेही मिळवली; त्यामध्ये वर्गात सर्व-प्रथम हे ठरलेलचं ! विशेषत: खो-खो ह्या सांघीक खेळात विशेष नैपुण्य प्राप्त केलं. पुढील वर्गाच्या मित्रांची जुनी पुस्तके, बायडींग केलेल्या वह्या, दिवा किंवा कंदिलाच्या मंद्प्रकाशात अभ्यास, वर्षाकाठी केवळ एक व एकच गणवेष हे तेव्हा त्यांच्या वाटयाला आलं!

जिद्द, चिकाटी, चौकस बुद्धी व अभ्यासू वृत्ती याचं फलीत म्हणजे दहावीच्या शालांत परिक्षेत ते ८० टक्के गुण मिळवून बावधन केंद्रात प्रथम आले. दहावीत कमी पडलेल्या गुणांची कसर त्यांनी बारावीच्या (शास्त्र) शालांत परीक्षेत ८१.१५ टक्के गुण मिळवून काढली. विशेष म्हणजे दहावी व बारावी दरम्यान त्यांनी एकही खाजगी शिकवणी लावली नाही. इतर मुलांप्रमाणे आता शिक्षण थांबवून नोकरी करून घरखर्चाचा अंशतः बोजा उचलावा ही घरातील निकड व काळाची गरज ! वडीलांची इच्छा असूनही केवळ आर्थिक बोजपाई त्यांना शिक्षण थांबवण्याची वेळ आली, मग अभियांत्रिकी किंवा पदवी अभ्यासक्रम त्यांनी एक वाळवंटातील मृगजळ वाटू लागलं. त्यांचं नशिब महान म्हणूनच अशावेळी त्यांचे आत्तेभाऊ - म्हेव्हणे- दाजी स्व. सदाशिव कृष्णा शिर्के (खंडाळा) यांनी परिस्थिती ओळखून त्यांच्यातल्या गुणवत्तेला वाव दिला. तदनंतरच्या पदवी (बी. एस्सी ) व पदव्युत्तर (एम. एस्सी ) शिक्षणाचा सर्व खर्च शिर्के यांनी केला. आपला एक मुलगाच मानुन दाजींनी त्यांच्या शिक्षणात जातीनं लक्ष घातलं, मोलाचं मार्गदर्शन केलं. शिक्षणासाठी स्वतःकडे ठेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पाडले. व्यवहारिक ताळेबंद, हुशारी, कृतीत विचारात अगर उक्तीत उमटणारा सुस्वभाव (टेंपरामेंट) हे सर्व गुण दाजींकडून अवलोकीले. शिक्षणाबरोबरच अधूनमधून दाजींच्या कापड व्यवसायात मदतही केली. या सर्वांचा पुढे त्यांना स्वतःचे एक यशस्वी व्यक्तिमत्त्व बनविण्यास उपयोग झाला. त्यामुळेच १९९२ च्या शिवाजी विद्यापिठाच्या बी. एस्सी. च्या परीक्षेत लोणंद येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून राजपूरेंनी विद्यापिठात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी बी. एस्सी. भाग-१,२ व ३ मध्ये एकूण ८८ टक्के गुण मिळवून विद्यापीठाचा 'वारंगे' पुरस्कार मिळवला. भाग-३ मध्ये भौतिकशास्त्रात ९१ टक्के गुण मिळवून 'शिर्के' पुरस्कार व 'डॉ. स्वामी' शिष्यवृत्तीही पटकावली. या यशाचे श्रेय लोणंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. दीपा महानवर यांना द्यायला ते विसरत नाहीत. १९८९ ते १९९२ या तीन वर्षांच्या लोणंद येथील त्यांच्या मार्गक्रमणात महानवर सरांचा महत्वाचा सहभाग राहीला. शक्य असलेली सर्वतोपरी मदत, चौकोटीबाहेर जावून केलेले प्रयत्न, तत्कालीन सहकारी प्रा. जयवंत थोरात, प्रा. (डॉ) महेंद्र पाटील तसेच प्रा. (डॉ) राजेंद्र निंबाळकर सरांकडून करून घेतलेली तयारी, प्रत्येक लहान-सान गोष्ठीसाठी प्रोत्साहन याचंच फलित म्हणजे बी. एस्सी. परेक्षेतील सुवर्णपदकाचा मान असं ते मानतात ! केशवला आपला दुसरा मुलगा समजून, शिक्षणात मदत केल्यास काय होवू शकेल याचा अचूक अंदाज महानवर सरांनी तेव्हा दाजींना पटवून दिला होता. विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याची बातमी कळाल्यावर खंडाळयात महानावर सरांनी केलेला सत्कार न- विसरण्याजोगा होता.

नंतर पदव्युत्तर शिक्षणसाठी त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठातील भौतिकशास्त्र विषयास प्रवेश घेतला. तेथेही जिद्द, चिकाटी व चौकस बुद्धीनं ते विषयांत सर्वप्रथम आले. एम. एस्सी च्या परीक्षेत राजपूरेंनी भौतिकशास्त्र विषयांत ६६ टक्के गुण मिळवून 'श्रीमती गंगुबाई दत्तात्रय कुलकर्णी (जांभळीकर), इचलकरंजी' पुरस्कार मिळवला.

त्यांचं नशिब महान म्हणूनच अशावेळी त्यांचे आत्तेभाऊ - म्हेव्हणे- दाजी स्व. सदाशिव कृष्णा शिर्के (खंडाळा ) यांनी परिस्थिती ओळखून त्यांच्यातल्या गुणवत्तेला वाव दिला. तदनंतरच्या पदवी (बी. एस्सी ) व पदव्युत्तर (एम. एस्सी ) शिक्षणाचा सर्व खर्च शिर्के यांनी केला. आपला एक मुलगाच मानुन दाजींनी त्यांच्या शिक्षणात जातीनं लक्ष घातलं, मोलाचं मार्गदर्शन केलं. शिक्षणासाठी स्वतःकडे ठेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पाडले. व्यवहारिक ताळेबंद, हुशारी, कृतीत विचारात अगर उक्तीत उमटणारा सुस्वभाव (टेंपरामेंट) हे सर्व गुण दाजींकडून अवलोकीले. शिक्षणाबरोबरच अधूनमधून दाजींच्या कापड व्यवसायात मदतही केली. या सर्वांचा पुढे त्यांना स्वतःचे एक यशस्वी व्यक्तिमत्त्व बनविण्यास उपयोग झाला. त्यामुळेच १९९२ च्या शिवाजी विद्यापिठाच्या बी. एस्सी. च्या परीक्षेत लोणंद येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून राजपूरेंनी विद्यापिठात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी बी. एस्सी. भाग-१,२ व ३ मध्ये एकूण ८८ टक्के गुण मिळवून विद्यापीठाचा 'वारंगे' पुरस्कार मिळवला. भाग-३ मध्ये भौतिकशास्त्रात ९१ टक्के गुण मिळवून 'शिर्के' पुरस्कार व 'डॉ. स्वामी' शिष्यवृत्तीही पटकावली. या यशाचे श्रेय लोणंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दीपा महानवर यांना द्यायला ते विसरत नाहीत. १९८९ ते १९९२ या तीन वर्षांच्या लोणंद येथील त्यांच्या मार्गक्रमणात महानवर सरांचा महत्वाचा सहभाग राहीला. शक्य असलेली सर्वतोपरी मदत, चौकोटीबाहेर जावून केलेले प्रयत्न, तत्कालीन सहकारी प्रा. जयवंत थोरात, प्रा. महेंद्र पाटील तसेच प्रा. राजेंद्र निंबाळकर सरांकडून करून घेतलेली तयारी, प्रत्येक लहान-सान गोष्ठीसाठी प्रोत्साहन याचंच फलित म्हणजे बी. एस्सी. परेक्षेतील सुवर्णपदकाचा मान असं ते मानतात ! केशवला आपला दुसरा मुलगा समजून शिक्षणात मदत केल्यास काय होवू शकेल याचा अचूक अंदाज महानवर सरांनी तेव्हा दाजीना पटवून दिला होता. विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याची बातमी कळाल्यावर खंडाळयात सरांनी केलेला सत्कार न- विसरण्याजोगा आहे.

एम. एस्सी नंतर प्रश्न होता नोकरीचा ! भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणं आजच्या प्रमाणं तेंव्हाही खुप कठीण काम होतं. मग इतरत्र नोकरीशोध थांबवून ऑक्टोबर १९९४ दरम्यान ते प्रा. ए.व्ही. राव सरांकडे युजिसी संशोधन प्रकल्पामध्ये 'प्रोजेक्ट फेलो' म्हणून काम करू लागले. जवळ - जवळ १ वर्ष ८ महिने या पदावर काम करूनसुद्धा, निव्वळ काही तांत्रिक अडचणींमुळे ते राव सरांकडे पी.एच.डी करू शकले नाहीत. दरम्यान ३१ डिसेंबर १९९५ रोजी त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. घरातील सर्व आर्थिक जबाबदारी असताना वडिलांचा मोठा आधार संपला होता. अशा वेळी त्यांना त्यांचे मित्र डॉ. प्रताप वाघ यांची कार्यतत्पर अशी समयसूचक मदत झाली. वर्षभर त्यांचा आर्थिक बोजाही वाघांनी उचलला. उक्तीत उमटणारा सुस्वभाव, प्रसंगी कसलेही कष्ट करण्याची तयारी, मनमिळावूपणा हे वाघ सरांचे गुण या दरम्यान राजपूरेंनी टिपले व स्वतःमध्ये आणले.

आता राजपूरेंना कायमच्या नोकरीची नितांत गरज भासू लागली. पण वस्तुस्थितीच अशी होती की नाईलाजास्तव सर्व काही बघत राहावं लागत होतं. पुढे जुन १९९६ ला ते डॉ. सी.एच. भोसले (प्रपाठक, भौतिकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये पुन्हा नव्या जोमाने व उमेदीने रुजू झाले. संशोधनादरम्यान भोसले सरांनी राजपूरेंना एका वेगळ्याच वस्तुस्थितीची जाणिव करून दिली - ज्ञानाबरोबरच जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तरच तुम्ही जीवनात पाहिजे ती उंची गाठू शकता ! एक चांगला शिक्षक कसा असावा याचे धडे भोसले सरांनीच त्यांना दिले. सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने राजपूरेंना सरांची शिकवण्याची हातोटी आत्मसात केली. दोन वर्ष जुनियर रिसर्च फेलो व एक वर्ष सिनिअर रिसर्च फेलो म्हणून काम केल्यावर त्यांचा उज्ज्वल भविष्यकाळ पुढे उभा राहिला !! शेवटी केलेल्या सर्व पराकाष्टांचे फळ झाले व जुलै १९९९ मध्ये त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये आधिव्याख्याता या पदावर निवड झाली.

राजपूरेंच्या 'स्टडीज ऑन प्रिपरेशन एन्ड कॅरेक्टरायझेशन ऑफ स्प्रे डिपोझिटेड अंटिमनी ट्रायसल्फाईड एन्ड अंटिमनी ट्राय सेलेनाईड थिन फिल्म्स एन्ड देयर युज इन स्टोरेज सेल्स' या शोध प्रबंधासाठी शिवाजी विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मे २००० ला बहाल केली. सदरच्या संशोधनासाठी राजपूरेंना डॉ. सी. एच. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या दरम्यान त्यांनी एकूण २४ शोध निबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध केले होते तसेच १९ शोध निबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यशाळांतून वाचले होते. प्रा. राजपुरे यांचा महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सच्या (पुणे) यांच्यावतीने ३० ऑक्टोबर २०१५ रोजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा, पुणे येथे गौरव करण्यात आला. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स हि महाराष्ट्रातील एक प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. या संस्थेमध्ये शास्त्रज्ञांची निवड हि त्यांच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक कार्याच्या आधारावर केली जाते. या संस्थेने त्यांना कायमचे सदसत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा सन्मान केला आहे.

जरी त्यांनी पीएचडी आणि सुवर्ण पदक जिंकले होते तरी प्राध्यापक म्हणून कायमपद मिळविण्यासाठी त्यांना पात्रता चाचणी ची अर्हता प्राप्त करावी लागणार होती. पुढे ते विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या 'आधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी' -सेट परीक्षा पास झाले. उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांनी या परीक्षेसाठी कधीही विशेष अभ्यास केला नाही. विशेषतः विभागामध्ये तेंव्हा नव्याने सुरु झालेल्या एम.एस्सी. भाग एक च्या सेमिनार एक्टीव्हिटी ला ते या यशाचे श्रेय देतात. भौतीकशास्त्रातून पात्रता चाचणी (एसइटी) परीक्षा उत्तीर्ण होणे हीच मुळी आव्हानात्मक गोष्ट आहे की जिचा निकाल तेव्हा १ टक्क्याहून कमी लागला होता. हे ते करू शकले ते निव्वळ त्यांच्यात निर्माण झालेल्या आत्मविश्वास, जिद्द आणि निश्चयी स्वभावामुळे ! अजूनही या विषयातून ही चाचणी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे.

सध्या डॉ. राजपूरे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयात प्राध्यापक या पदावर काम करत आहेत. जुन १९९९ पासून ते विभागातील 'शिक्षकांचे सचिव' म्हणून काम पाहत आहेत. त्यांची शिस्त-प्रिय तसेच विद्यार्थी-प्रिय शिक्षक म्हणूनही ख्याती आहे. विभागातील अभ्यासक्रमाचे नुतनीकरण असो, विद्यार्थ्यांचे श्रमदान असो, सेमिनार एक्टीव्हिटी असो किंवा न्याक मुल्यांकन समिती असो, त्यांचा उत्स्फुर्त सहभाग हा ठरलेलाच. कोणत्याही कार्यक्रमांचे सुसुत्र पद्धतीने नियोजन आणि आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

आत्तापर्यंत त्यांचे एकूण १८५ शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये एका रिव्हिव्ह आर्टीकल चा देखील समावेश होतो. त्यांच्या 'पाणि शुद्धिकरणा' संबंधित वैशिष्ठपुर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केलेली आहे व आणखी दोघेजण पीएच. डी. साठी सध्या मार्गदर्शन घेत आहेत. यातील काही विद्यार्थी पुढे दक्षिण कोरिया येथे उच्च शिक्षण घेत आहेत, तसेच इतर पुणे विद्यापीठ, विद्या प्रतिष्ठान, बारामती, दत्ताजीराव कदम कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे सहाय्यक प्राध्यापक पदी काम करीत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या निधीतील पाच प्रकल्प यशस्वीरित्या पुर्ण केले आहेत. या अनुदानातून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत छान संशोधन सुविधांची निर्मिती करुन विभागाच्या पायाभूत संशोधन सुविधे मध्ये भर घातली आहे. त्यांनी भौतिकशास्त्र विभागातील संशोधन सुविधा केंद्र विकसित करण्यास मदत केली आहे. ब-याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पीएच. डी. साठी ते परिक्षक आहेत.

त्यांचे कर्तुत्व, क्षमता आणि शैक्षणिक यश या सर्वांचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने जून २०१६ पासून त्यांच्यावर यूसिक, सीएफसी आणि एसएआयएफ या केंद्रीय सुविधा केंद्रांच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. अलीकडेच त्यांची विभागप्रमुख म्हणून एक वर्षाची मातृसंस्थेची सेवा झाली.

मुंबईस्थित श्री. ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या सेवाभावी संस्थेचे ते सभासद आहेत. बहूजन समाजातील, गरीब शेतकरी कुटूंबातील तरुण, होतकरू विध्यार्थी, त्यांच्या सुप्त गुणांचा विकास फक्त आर्थिक अडचणीमुळं व योग्य मार्गदर्शनाअभावी करू शकत नसतील, तर या मंडळाचे कार्यकर्ते अशा गुणीजणांना पुढे आणण्याचं कार्य करतात. राजपुरेंच्या या यशात बऱ्याच व्यक्तीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यां व्यक्तीपैकी त्यांचे मित्र, हनुमंत मांढरे, रवींद्र अनपट, दिलीप अनपट, अनिल अनपट; कि जे या मंडळाचे संस्थापक सदस्य आहेत, त्यांचे बहूमोल सहकार्य व प्रोत्साहन त्यांना शिक्षणादरम्यान झाले. त्यांचे ते शतश: ऋणी आहेत ! त्यांचे वडीलबंधू बाळासाहेब हे उच्च विद्याविभूषीत (एम.कॉम.) असूनही सुरुवातीपासून गावाकडील कुटूंबाची तसेच शेतीची सर्व जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यामुळेच त्यांना हे शक्य झाल्याची पुर्ण जाणीव त्यांना आहे.

ते डॉक्टर झाले. हा डॉक्टर बावधनच्या मातीतील आहे याचा त्यांना सार्थ स्वाभिमान आहे. गावातील तरुण पिढीला मार्गदर्शन करताना ते सांगतात - की तुम्हीही उच्च - विद्याविभूषित व एक यशस्वी व्यक्तिमत्त्व होऊ शकता. तुम्हाला फक्त एकच कराव लागेल- अगदी जिद्दीनं, प्रामाणिकपणे विद्याग्रहण कराव लागेल. घरच्या प्रतिकूल परिस्तिथीशी सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अनेक वेळा शाळेची फी सुद्धा भरणे शक्य नव्हते, अशा कठीण प्रसंगातून जात त्यांनी हे यश संपादन केले आहे. प्रा. राजपुरे यांच्या वडिलांची खूप इच्छा होती की माझ्या मुलाने शिकून खूप मोठ नाव कमवावे, ही इच्छा त्यांनी पूर्ण केली. आर्थिक अडचणी प्रत्येकालाच आहेत. या अडचणी तुम्हाला विद्येपासून वंचित ठेऊ शकतचं नाही.

कोल्हापूर
२८ जुलै २०१३