महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स

महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सतर्फे प्रा.(डॉ). के. वाय. राजपुरे यांचा गौरव महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सतर्फे प्रा.(डॉ). के. वाय. राजपुरे यांचा गौरव शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रा.(डॉ). के. वाय. राजपुरे यांचा महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सच्या (पुणे) यांच्यावतीने ३०/१०/२०१५ रोजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा, पुणे येथे गौरव करण्यात आला. महाराष्ट्रामधून निवडलेल्या भौतिक विज्ञान विषयातील शास्त्रज्ञामध्ये शिवाजी विद्यापीठातून त्यांची ऐकमेव निवड झाली आहे. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स हि महाराष्ट्रातील एक प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. असंख्य विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न मांडण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेची १९७६ साली स्थापना करण्यात आली. या अकादमीमध्ये विविध क्षेत्रांमधील शिस्तप्रिय वैज्ञानिकांची दरवर्षी निवड केली जाते. विशेषतः यामध्ये प्रामुख्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात विशेष आवड असणारे महाराष्ट्रातील विविध शास्त्रज्ञांचा समावेश होतो. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेमध्ये शास्त्रज्ञांची निवड हि त्यांच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक कार्याच्या आधारावर केली जाते. आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ६५० प्राध्यापकांना हि शिष्यवृत्ती मिळालेली आहे. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स हि संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान याशिवाय महाराष्ट्रातील विकासाशी संबंधित विविध मुद्दे यांवर सुद्धा कार्य करत आहे. सध्या प्रा. जी. डी. यादव (ICT, मुंबई) हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.१९९२ च्या शिवाजी विद्यापिठाच्या बी. एस्सी. च्या परीक्षेत लोणंद येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून राजपूरेंनी विद्यापिठात प्रथम क्रमांक मिळवला होता. ते विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या 'आधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी' -सेट परीक्षाही पास झाले आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी हे यश मिळवले होते. सध्या डॉ. के. वाय. राजपूरे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयात प्राध्यापक या पदावर काम करत आहेत. आत्तापर्यंत त्यांचे एकूण १५५ शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या 'पाणि शुद्धिकरणा' संबंधित वैशिष्ठपुर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थ्यांनी पी. एच. डी. पदवी संपादन केलेली आहे व आणखी आठजण पी. एच. डी. साठी सध्या मार्गदर्शन घेत आहेत. डॉ. के. वाय. राजपूरे यांनी केंद्र सरकारच्या निधीतील तीन प्रकल्प यशस्वीरित्या पुर्ण करून आणखी दोन प्रकल्प चालवत आहेत. तसेच ते बऱ्याच संशोधन मासिकांचे व विविध विद्यापीठांतील पी. एच. डी. साठी ते परिक्षक आहेत. प्रा.(डॉ). के. वाय. राजपुरे हे वाई तालुक्यातील अनपटवाडी या गावाचे सुपत्र आहेत. घरच्या प्रतिकूल परिस्तिथीशी सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अनेक वेळा शाळेची फी सुद्धा भरणे शक्य नव्हते, अशा कठीण प्रसंगातून जात त्यांनी हे यश संपादन केले आहे. प्रा.(डॉ). के. वाय. राजपुरे यांच्या वडिलांची खूप इच्छा होती की माझ्या मुलाने शिकून खूप मोठ नाव कमवावे, ही इच्छा त्यांनी पूर्ण केली परंतु हे यश पाहण्यासाठी त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत. डॉ. राजपुरे हे बहूजन समाजातील, गरीब शेतकरी कुटूंबातील तरुण, होतकरू विध्यार्थी, यांचे आदर्श आहेत. ज्या अडचणींना राजपुरे सामोरे गेले होते अशा अडचणींना गरीब आणि होतकरू विध्यार्थी जात असतील तर अशा गुणीजणांना पुढे आणण्याचं कार्य देखील आज ते एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करतात. एवढ यश संपादन केले तरी आपल्या माय मातीची ओढ त्यांना कायम आहे. आपल्या अनपटवाडी गावातील शिक्षित मुलांना ते वेळो वेळी मार्गदर्शन करतात, त्यांच्या अडी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या यशाच श्रेय ते आपल्या माता पित्यांना देतात.

महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स, पुणे या संस्थेने डॉ.केशव यशवंत राजपुरे यांना कायमचे सदसत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा सन्मान केला आहे. या सर्व कामाची पोहच पावती महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सतर्फे मिळालेल्या गौरवमुळे प्राप्त झाली आहे. कदाचित वाई तालुक्यात हा बहुमान मिळवणारे डॉ.केशव यशवंत राजपुरे हे एकमेव व्यक्तीमत्व आहे की जे पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. चंद्रकांत लोखंडे, त्यांचे मार्गदर्शक प्रा. चंद्रकांत भोसले, मा. आमदार मकरंद (आबा) पाटील, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पिसाळ, मा. शंकरराव गाढवे, अनिरुद्द गाढवे, नितीन मांढरे ,अनपटवाडी ग्रामस्थ, तसेच दरेवाडी ग्रामस्थ, श्री.ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (बावधन) चे सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा दिल्या.